🌽🌱🌞🦐🫕🍯
———-–——
💬 माझा श्रीगोंदा
📮 डायरेक्ट टू इनबॉक्स
💁♂ bit.ly/Myshrigonda
———-–——
🫕आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ.
🫕शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते.
🫕कर्बोदके, प्रथिने व मेद हे ऊर्जा निर्माण करणारे आहारातील तीन मुख्य घटक आहेत. क्षार व खनिजे, जीवनसत्त्वे, पाणी आणि तंतुमय पदार्थ हे अन्य आवश्यक घटक आहेत. आहारातील सर्व घटक योग्य प्रमाणात व योग्य प्रतीचे असल्यास तो समतोल आहार होतो.
शरीरस्वास्थ्य व रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी समतोल आहार आवश्यक असतो.
🌱कर्बोदके
💁♂हे कार्बनयुक्त पदार्थ असून यांत तृणधान्ये, कडधान्ये, काही भाज्या (बटाटे, रताळी), फळे, शर्करा इ. पदार्थांचा समावेश होतो. पचनसंस्थेत आतड्यात विकरांची (एंझाइमांची) प्रक्रिया होऊन ग्लुकोजमध्ये रूपांतर होते व पेशीत वाटप होते.
💁♂यांपासून ताबडतोब ऊर्जानिर्मिती होते. ग्लुकोजचे ज्वलन होऊन पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड हे पदार्थ तयार होतात.
💁♂अतिरिक्त ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर होते आणि ते यकृत तसेच स्नायूंमध्ये साठविले जाते.
💁♂मानवाला दररोज ४०० ते ५०० ग्रॅम कर्बोदकांची गरज असते. १ ग्रॅम कर्बोदकांपासून ४ कॅलरी ऊर्जा मिळते.
🤩 इंग्रजी बोलणे अवघड आहे का❓
💁♂ वाचा: bit.ly/3K5UJ5Q
🧬प्रथिने
💁♂प्रथिनांचे मुख्य कार्य रचनात्मक व शरीराच्या जडणघडणीचे असते. संप्रेरके, विकरे व प्रतिपिंडे तयार होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. शरीराची झीज भरून काढणे व ऊर्जानिर्मिती करणे हे प्रथिनांचे मुख्य कार्य आहे.
💁♂१ ग्रॅम प्रथिनांपासून ४ कॅलरी ऊर्जा मिळते. तृणधान्ये, कडधान्ये, मासे, मांस, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, फळे, शेंगदाणे, सोयाबीन, नाचणी यांपासून प्रथिनांचा पुरवठा होतो. ही स्नायूंमध्ये साठविली जातात.
💁♂मानवाला दररोज ७० ते १०० ग्रॅम प्रथिनांची गरज भासते. प्रत्येक शारीरिक क्रियेत प्रथिनांची झीज होत असते. झीज भरून काढायला रोज प्रथिने खावी लागतात. प्रथिनांची न्यूनता झाली तर शारीरिक व मानसिक वाढ खुंटते.
🍯मेद व मेदाम्ले
💁♂तेल, तूप, लोणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यांमध्ये विपुल प्रमाणात दृश्य स्वरूपात आणि डाळ कडधान्ये, शेंगदाणे यांमध्ये अदृश्य स्वरूपात मेद स्निग्ध पदार्थ व मेदाम्ले असतात.
💁♂मेद हा ऊर्जेचा मोठा स्रोत असून १ ग्रॅमपासून ९ कॅलरी ऊर्जा मिळते.
💁♂मेदाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन इंधन म्हणून वापरले जाते. काही संप्रेरके, पेशींचे आवरण व शरीराचे तापमान समतोल राखणे यासाठी मेदाची आवश्यकता असते.
🦐क्षार आणि खनिजे
💁♂क्षार व खनिजे आपल्याला सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. चयापचयाचे नियंत्रण, पचनक्रिया, द्रव पदार्थांच्या समतोलासाठी, विकरांद्वारे घडणार्या क्रियांसाठी व संप्रेरकाचा भाग म्हणून हे आवश्यक असतात. निरनिराळ्या अन्नांतून व मसाल्याच्या पदार्थांतून याचा पुरवठा होतो.
🌞जीवनसत्त्वे
💁♂जीवनसत्त्वे ही कार्बनी संयुगे आहेत. या पदार्थांपासून ऊर्जा मिळत नाही पण ऊर्जानिर्मितीत व चयापचय क्रियेत ती महत्त्वाची भूमिका बजावतात.
💁♂जीवनसत्त्वे दोन प्रकारची आहेत : ‘अ’, ‘ड’, ‘ई’ व ‘के’ ही जीवनसत्त्वे मेदात विरघळतात, तर ‘ब’ समूह’ व ‘क’ ही जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात.
💁♂मेदात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठविली जातात. म्हणून जास्त घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.
💁♂पाण्यात विरघळणारी अतिरिक्त जीवनसत्त्वे लघवीवाटे शरीराबाहेर फेकली जातात. ‘क’ व ‘ब समूह’ जीवनसत्त्वे, प्रथिने, कर्बोदके, मेद यांच्या चयापचयासाठी व ऊर्जेच्या वाटपासाठी आवश्यक आहेत.
💁♂दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, प्राण्यांचे यकृत, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, डाळी, तृणधान्ये व मोड आलेली कडधान्ये यांपासून आपल्याला जीवनसत्त्वे मिळतात.
🎯स्पोकन इंग्लिश साठी : Bit.ly/ENN-glish
🫗पाणी
💁♂पाणी हा सर्व जीवनक्रियांचा मुख्य आधार आहे. पाण्यापासून उर्जा मिळत नाही.
💁♂आपल्याला रोज सु. २.५ – ३ लिटर पाणी लागते. ऋतूप्रमाणे व शारीरिक श्रमाप्रमाणे पाण्याची आवश्यकता बदलते.
🌽तंतुमय पदार्थ
💁♂तंतुमय पदार्थ शरीरात शोषले जात नाहीत. ते खाल्ले की भूक भागल्याची भावना निर्माण होते. रक्तातील कोलेस्टेरॉल व शर्करा कमी करण्यासाठी आणि आतड्याच्या हालचालींसाठी ते उपयुक्त ठरतात. बद्धकोष्ठतेच्या विकारांवर ते उपयोगी ठरतात.
💁♂इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी भारतातील प्रौढ व्यक्तींसाठी शिफारस केलेला समतोल आहार कोष्टकात दिलेला आहे :
🍎आहारातील अन्नघटक (ग्रॅममध्ये)
आहारातील अन्नघटक (ग्रॅममध्ये)
💁♂ 👱 🧔♀️
घटक पुरुष : स्त्री
डाळी- 50 : 45
मासे/अंडे 30 : 30
तेल/तूप 45 : 25
शर्करा 35 : 20
कंदमुळे 60 : 50
फळभाज्या 70 : 40
तृण- 520 : 440
दूध/दही 200 : 150
पालेभाज्या 40 : 100*
*स्त्रियांना अधिक लोहाची गरज असते. पालेभाज्यांतून अधिक लोह मिळते.
💁♂पुरुषांना २,८०० कॅलरी आणि स्त्रियांना २,२०० कॅलरी ऊर्जेची दररोज आवश्यकता असते.
💁♂कष्टाची कामे करणारे किंवा खेळाडू यांना अधिक कॅलरी (ऊर्जेच्या आहाराची) आवश्यकता असते. गरोदर तसेच स्तनपान देणार्या स्त्रियांना २,७०० कॅलरीचा आहार लागतो.
💁♂ज्येष्ठ नागरिकांना २०००-२,२०० कॅलरीचा आहार पुरेसा होतो.
———-–——
💬 माझा श्रीगोंदा
📮 डायरेक्ट टू इनबॉक्स
💁♂ bit.ly/Myshrigonda
———-–——